esakal | एकही लस विकत न घेता राज्याची जाहिरातबाजी
sakal

बोलून बातमी शोधा

pune

एकही लस विकत न घेता राज्याची जाहिरातबाजी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गराडे : कोरोनाच्या काळामध्ये सर्वात जास्त या आशा सेविका व अंगणवाडी सेविका रस्त्यावर होत्या. आशा सेविकांनी व डॉक्टरांनी असंख्य लोकांचे प्राण वाचवले आहेत. लसीकरण सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याबाबत राज्य सरकार सांगत आहे. आतापर्यंत एकही लस राज्य सरकारने विकत घेतली नाही. केंद्र शासनाने सर्व लशी पुरवलेल्या आहेत. मात्र, राज्य सरकार फक्त मोठी जाहिरातबाजी करत आहे, असा टोला आमदार जयकुमार गोरे यांनी लावला.

एखतपूर (ता. पुरंदर) येथे नुकताच बेलसर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक डॉक्टर व काही सामाजिक संस्थांनी कोविड काळामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या वतीने ॲड. श्रीकांत ताम्हाणे यांनी केले होते. यावेळी आमदार गोरे बोलत होते.

कोरोनाच्या काळामध्ये सर्वप्रथम भाजपचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरून जीव धोक्यात घालून काम करत होते. यामध्ये काही कार्यकर्त्यांना आपला प्राण गमवावा लागला असल्याचे भाजपचे आमदार राम सातपुते यांनी यावेळी सांगितले.

भारतीय जनता युवा मोर्चा पुणे ग्रामीणचे सरचिटणीस ॲड. श्रीकांत ताम्हाणे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘दायित्व वर्षपूर्ती’ या अहवालाचे प्रकाशन, कोविड १९ संकटात काम करणाऱ्या सामाजिक संघटनांत ग्रामीण संस्था पुरंदर, जेजुरी आरोग्य सेवा संघ, ऋणानूबंद फाउंडेशन, चिंतामणी हॉस्पिटलचे संचालक डॉ. भास्करराव आत्राम, सासवड रुग्णालयाचे डॉ. किरण राऊत यांना विशेष सन्मान तसेच बेलसर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या २७ आशा सेविका यांचा सन्मान तसेच ४ लाख रुपयांचा पंतप्रधान जीवन ज्योती योजना व अपघात विमा योजनेसाठीच्या धनादेश सुपूर्द करण्यात आला.

हेही वाचा: Pune : पिंपळे सौदागरमध्ये वाहतुकीचा बट्ट्याबोळ

या वेळी भारतीय जनता युवा मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरसचे आमदार राम सातपुते, माण खटावचे आमदार गोरे, भाजप पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, पुणे जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष नगरसेवक किरण दगडे पाटील, किसान मोर्चाचे गणेश आखाडे, संदेश जाधव, श्याम पुसदकर, नानामहाराज खळदकर, पंचायत समिती माजी सभापती नीलेश जगताप, रा. स्व. संघ पुणे विभाग संपर्क प्रमुख सुनील देशपांडे, बापू भागवत, माऊली माने, प्रतीक जाधव, गोविंद देवकाते, युवराज तावरे, प्रमोद तावरे, शुभम तुपे, साकेत जगताप, केशव गोसावी, सरपंच बापू झुरंगे, रामभाऊ झुरंगे, जनार्दन मोरे, काळूराम झुरंगे, विजय झुरंगे, अन्सार शिकलगार, दिलीप पवार, शांतराम झुरंगे, हनुमंत झुरंगे, संकेत मोरे, प्रशांत शेवकरी, अमित गोरे, शंभूराजे कोंढेकर, सागर धिवार, अनिकेत झुरंगे, पंकज झुरंगे आदी उपस्थित होत्या.

ॲड. श्रीकांत ताम्हाणे यांचे अभिनंदन

तालुक्यात काँग्रेसचे आमदार संजय जगताप आहेत. पण त्यांच्या कामाची दखल आपण घेऊन त्यांच्या पत्नी राजवर्धिनी जगताप यांच्या ग्रामीण संस्थेला सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेतल्याबद्दल ॲड. श्रीकांत ताम्हाणे यांचे अभिनंदन आमदार जयकुमार गोरे यांनी केले.

loading image
go to top