
राज्य बँकेची सामोपचार कर्ज परतफेड योजना सुरू
पुणे : राज्यातील साखर कारखाने आणि सहकार क्षेत्रातील इतर आजारी संस्थांना त्यांच्या थकीत कर्ज वसुलीसाठी व्याजदरामध्ये जादा सवलत आणि परतफेडीसाठी जादा मुदत देणे क्रमप्राप्त होते. या संदर्भात महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने आजारी साखर कारखाने आणि इतर सहकारी संस्थांसाठी सहा टक्के सरळ व्याजदराची सामोपचार परतफेड योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य बॅंकेच्या १११ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांशी चर्चा करुन संमती घेतली आहे. सध्या अशा कर्जदारांकडे गुंतलेली थकीत रक्कम सुमारे १ हजार ७५६ कोटी आहे. त्यापैकी सुमारे ६० टक्के रक्कम म्हणजे एक हजार कोटींहून अधिक रक्कम वसूल होण्याची शक्यता आहे. या सर्व थकीत रक्कमेची बँकेने १०० टक्के तरतूद केली आहे. त्यामुळे वसुल होणारी सर्व रक्कम थेट नफ्याला जाणार आहे.
योजनेसाठी पात्र आजारी साखर कारखाने आणि सहकारी संस्था
३१ मार्च २०२२ अखेर अनुत्पादित वर्गवारीतील साखर कारखाने
सहकारी संस्थांकडील सर्व कर्ज खात्यांना ही योजना लागू
कर्जदाराबरोबरच जामीनदारांनाही स्वतंत्रपणे किंवा एकत्रित संस्थेच्या वतीने अर्ज करता येईल.वसुलीसाठी कायदेशीर कारवाई सुरू असलेल्या संस्था
राज्य बँकेने ताब्यात घेतलेल्या परंतु अद्याप विक्री न झालेल्या संस्था
योजनेसाठी अपात्र कर्जदार
रिझर्व्ह बँक आणि नाबार्डच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही योजना पुढील साखर कारखाने आणि सहकारी संस्थांनी घेतलेल्या कर्जांना लागू होणार नाही.फसवणूक, गैरव्यवहार आणि जाणीवपूर्वक थकविलेली कर्जे.
आजी व माजी संचालकांसह त्यांच्याशी हितसंबंध असणाऱ्या भागीदारी संस्था
कंपन्यांना अथवा त्यांच्या जामीन असलेल्या कर्जांना रिझर्व्ह बँकेच्या पूर्व परवानगीशिवाय सवलत नाही
संचालकांच्या कुटुंबातील व्यक्ती आणि ते जामीनदार असलेली कर्जे (पत्नी, पती, आई, वडील, बहिण, मुलगा, मुलगी, जावई किंवा सून)न्यायालयासमोर तडजोड झालेली कर्जप्रकरणे शासकीय थकहमी कर्ज योजना आदी.
राज्य सहकारी बँकेने सुरू केलेल्या या सामोपचार परतफेड योजनेमुळे राज्यातील आजारी साखर कारखान्यांना ऊर्जितावस्था प्राप्त होणार आहे. ग्रामीण भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेचा लाभ आजारी साखर कारखाने आणि इतर सहकारी संस्थांनी घ्यावा.
- विद्याधर अनास्कर, प्रशासक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक
Web Title: State Bank Loan Repayment Scheme Launched Scheme For Sugar Factories Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..