

Chief Minister Devendra Fadnavis Unveils Calendar
Sakal
पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून ‘सहकार संस्कृती’ या विषयावर सन २०२६ साठी तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन बुधवारी (ता. १७) रोजी मुख्यमंत्र्यांच्या दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे, मुख्य महाव्यवस्थापक अशोक माने आदी उपस्थित होते.