दहावी-बारावी निकालाच्या तारखांबाबत राज्य शिक्षण मंडळाने दिले स्पष्टीकरण; निकालाच्या तारखा...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SSC_HSC_Students

निकालाच्या वेगवेगळ्या तारखा व्हाट्सएप, फेसबुक अशा सोशल मीडियाद्वारे परस्पर प्रसिद्ध  करण्यात येत आहेत.

दहावी-बारावी निकालाच्या तारखांबाबत राज्य शिक्षण मंडळाने दिले स्पष्टीकरण; निकालाच्या तारखा...!

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२०मध्ये घेतलेल्या बारावी आणि दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख मंडळाने आजमितीस जाहीर केलेली नाही.

- 'आरटीई'ची दुसरी सोडत जाहीर करा, अन्यथा...; मनसे विद्यार्थी संघटनेने दिला इशारा!

त्यामुळे निकालाच्या वेगवेगळ्या तारखा व्हाट्सएप, फेसबुक अशा सोशल मीडियाद्वारे परस्पर प्रसिद्ध  करण्यात येत आहेत. त्यावर विद्यार्थी आणि पालकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.

फेब्रुवारी-मार्च २०२०मध्ये घेण्यात आलेल्या बारावी आणि दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख मंडळाच्या वतीने अधिकृत ई-मेल, प्रसिद्धी माध्यमे आणि मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. याची विद्यार्थी, पालक, शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि संबंधितांनी नोंद घ्यावी, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.

शिवराज्याभिषेक दिन ऑनलाइन; ३२ देशांतील मराठी बांधव सहभागी

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात दहावी-बारावीचा निकाल आज लागणार, उद्या लागणार या बाबतच्या खोट्या बातम्या व्हायरल होत आहेत. त्यामुळे अनेकांचा गोंधळ उडाला आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि त्यांचे पालक अशा मेसेजमुळे त्रासून गेले आहेत. 

- 'आमची परीक्षा घेण्याची तयारी, पण...'; शिक्षण संस्थांनी भूमिका केली स्पष्ट!

कोरोना व्हायरसमुळे सर्व शाळा आणि कनिष्ठ विद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे निकालाची तारीख नक्की काय आहे, याची खात्री करण्यासाठी पालक शिक्षकांशी फोनवरून संपर्क साधत आहेत. मात्र, अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत तारीख बोर्डाने जाहीर केली नसल्याची माहिती शिक्षक विद्यार्थी आणि पालकांना देत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

loading image
go to top