Narayangaon Crime : राज्य उत्पादन शुल्क विभागाची जुन्नर व पारनेर तालुक्यात धडाकेबाज कारवाई; लाखो रुपये किमतीचा बनावट विदेशी मद्य साठा जप्त, तीन आरोपींना अटक

नारायणगाव विभागातील राज्य उत्पादन शुल्क पथकाने जुन्नर तालुक्यातील बांगरवाडी व पारनेर तालुक्यातील अळकुटी येथे छापा टाकून एकूण 11 लाख 55 हजार 360 रुपये किमतीचा बनावट विदेशी मद्य साठा केला जप्त.
Stock of counterfeit foreign liquor seized

Stock of counterfeit foreign liquor seized

sakal

Updated on: 

नारायणगाव - नारायणगाव विभागातील राज्य उत्पादन शुल्क पथकाने जुन्नर तालुक्यातील बांगरवाडी व पारनेर तालुक्यातील अळकुटी येथे छापा टाकून एकूण 11 लाख 55 हजार 360 रुपये किमतीचा बनावट विदेशी मद्य साठा जप्त केला आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. आरोपींना जुन्नर न्यायालयाने 2 नोव्हेंबर 2026 पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क नारायणगाव विभागाचे पोलीस निरीक्षक शरद जाधव,दुय्यम निरीक्षक सौरभ आवटे यांनी दिली.

Loading content, please wait...