State Excise Department Seizes Fake Foreign Liquor
sakal
नारायणगाव - राज्य उत्पादन शुल्क नारायणगांव विभागाच्या पथकाने शिरोली खुर्द (ता. जुन्नर) येथे छापा टाकून बनावट विदेशी मद्याच्या 329 बाटल्या, बनावट बुचे, कॅप्स, मोटार असा 4 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक शरद जाधव, दुय्यम निरीक्षक सौरभ आवटे यांनी दिली.