
Agricultural News
Sakal
सोमेश्वरनगर : राज्य सरकारने २१ फेब्रुवारी २०२२ रोजी उसाच्या एफआरपीचे तुकडे करणारा काढलेला आदेश मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता. या निकालाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. असे असताना आजअखेर चार वेळा तारखा पडल्यावरही याचिका करणारे राज्य सरकारच सामोरे गेलेले नाही. प्रतिवादी केलेले राजू शेट्टी मात्र प्रत्येक तारखेला उपस्थित राहत आहेत.