

PNE26W41690
अहिल्यानगर ः जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली.
सेवानिवृत्तीची मर्यादा वाढवा
सरकारी कर्मचाऱ्यांची निदर्शने ः कॅशलेस विमा लागू करण्याची मागणी
अहिल्यानगर, ता. ११ ः राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत चेतना दिन व मागणी दिन एकजुटीने साजरा केला. विविध मागण्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली.
या आंदोलनात संघटनेचे सरचिटणीस रावसाहेब निमसे, अध्यक्ष सुभाष तळेकर, उपाध्यक्ष अशोक मासाळ, विजय काकडे, भाऊ शिंदे, सुनील आहेर, सहचिटणीस संदीपान कासार, पुरुषोत्तम आडेप, सागर गायकवाड, मुकुंद शिंदे, मंजूषा बागडे, सी. पी. नोडके आदी सहभागी झाले होते. ११ ऑगस्ट १९६६ हा दिन राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या जीवनातील संघर्षाचा आरंभिक टप्पा होता. त्या स्मृतीस उजाळा देत जिल्हा प्रशासनासमोर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित व न्याय्य मागण्यांचा आग्रह धरण्यात आला.
यावेळी निमसे यांनी संघटनेच्या एकजुटीने अनेक मागण्यांना यश आल्याचे स्पष्ट केले. तळेकर यांनी सरकारी कर्मचारी एकजुटीने त्यांच्या हक्कासाठी संघर्ष करीत असून, या मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले.
..................
या आहेत मागण्या
१ मार्च २०२४ पासून आजपर्यंत सेवानिवृत्त झालेल्या व सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेसाठी विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्यांना योजना अंमलबजावणीचे अंतिम आदेश येईपर्यंत तात्पुरते निवृत्ती वेतन तत्काळ देण्यात यावे. चतुर्थश्रेणी व वाहनचालक पदांसह सर्व रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावीत. सेवानिवृत्तीची मर्यादा ६० वर्षे करण्यात यावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.