
पुणे : राज्य सरकारने पुणे महापालिकेची प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले आहेत पण त्याचे वेळापत्रक अद्याप महापालिका प्रशासनाला प्राप्त झाले नाही. मात्र, लवकरच आदेश मिळतील या आशेवर प्रशासनाकडून त्यासाठीची तयारी सुरु केली आहे. पारदर्शक व नियमानुसार योग्य प्रभाग रचना करण्यासाठी सॅटेलाईट इमेजचा वापर केला जाणार आहे.