
बारामती - या राज्यात महिलांवर होणारे अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आहे, महिला अत्याचाराबाबत सरकार असंवेदनशील आहे, दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात घडलेली घटना वेदनादायी आहे, या प्रकाराची संपूर्ण चौकशी व्हायला हवी, या प्रकाराबद्दल राजकारण केले जाते असे भाजपच्या नेत्यांनी बोलणे या बद्दल या सरकारला लाज वाटायला पाहिजे, या प्रकाराचा आणि सरकारचाही आम्ही जाहीर निषेध करतो अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.