राज्य सरकारने टोलवाटोलवी न करता शेतकऱ्यांना मदत करावी : देवेंद्र फडणवीस

डॉ. संदेश शहा
Monday, 19 October 2020

उद्धवजी ठाकरे यांनी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी मागणी केल्याप्रमाणे त्यांनी अशी मदत शेतकऱ्यांना तात्काळ न्याय द्यावा अशी मागणी राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

इंदापूर : अतिवृष्टीमुळे ज्यांच्या घरांचे नुकसान झाले, त्यांना आम्ही सत्तेत असताना साडेतीन किंवा अडीच लाख रुपयांची तात्काळ मदत दिली होती. तो कोल्हापूर पॅटर्न म्हणून आजदेखील ओळखला जातो. त्यामुळे राज्यात अतिवृष्टीमुळे जिथे घरांचे नुकसान झाले आहे, तेथे शासनाने कोल्हापूर पॅटर्नची तात्काळ अंमल बजावणी करावी. तसेच मागील अतिवृष्टीमध्ये विद्यमान मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी मागणी केल्याप्रमाणे त्यांनी अशी मदत शेतकऱ्यांना तात्काळ न्याय द्यावा अशी मागणी राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी विरोधी नेते प्रविण दरेकर, खासदार रणजित निंबाळकर, आमदार राहुल कुल व राम सातपुते, गणेश भेगडे, बाळासाहेब गावडे, आप्पासाहेब जगदाळे, मारुतराव वणवे, तानाजी थोरात, माऊली चवरे, राजवर्धन पाटील उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ''शेतकरी हा प्रथम आपल्याकडील पैसे लावून शेती करतो मात्र शेतमालाची विक्री झाल्यानंतर त्याच्याकडे पैसे येतात. त्यामुळे राज्य सरकारने टोलवाटोलवी
व वेळकाढूपणा न करता त्यांना प्रथम मदत करणे गरजेचे आहे. ती त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रथम मशागत व तण काढणी करून त्यांना पुन्हा रब्बीचे पीक घेण्यासाठी मदत करणे गरजेचे आहे. आम्ही ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना तात्काळ 10 हजार कोटींची मदत केली होती, त्या प्रमाणे या सरकारने दौरे करण्याबरोबरच तातडीची मदत देणे गरजेचे आहे.'' तसे न केल्यास शेतकरी व शेती व्यवसाय संपूर्ण कोलमडून जाईल अशी भीती त्यांनी शेवटी व्यक्त केली.

पुणे-दौंड लोकल उद्यापासून सुरू होण्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली असताना राज्य सरकार मात्र निर्णय घेण्यास कमी पडत आहे. त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारच्या नावाने ओरड न करता शेतकऱ्यांना तातडीने मदत करणे गरजेचे आहे. कारण ही वेळ राजकारण करण्याची नाही असे स्पष्ट प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state government should help farmers says devendra fadnavis