पुणे - 'अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्र्यांसह आम्ही शेतीच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे. मंत्रिमंडळात शेतकऱ्यांना मदतीसाठी योग्य निर्णय घेतला जाईल. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे, त्यांच्यासाठी आम्ही अटीशर्ती शिथिल करू शकतो असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.