

State GST officers protest in Pune over pending demands and administrative delays
Sakal
पुणे : राज्य वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागातील अधिकाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी (दि. ८) द्वारसभा घेऊन आंदोलनाची सुरुवात केली. अनेक वेळा लेखी निवेदने, बैठका आणि चर्चेनंतरही प्रशासनाकडून अपेक्षित निर्णय न मिळाल्याने अधिकाऱ्यांनी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.