esakal | कोरोनाचे संकट टळू दे...राज्यमंत्री भरणे यांचे गणरायाला साकडे
sakal

बोलून बातमी शोधा

dattatray bharne

कोरोनाचे संकट टळू दे...राज्यमंत्री भरणे यांचे गणरायाला साकडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वालचंदनगर : भरणेवाडी (ता.इंदापूर) येथे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी निवासस्थानी साधेपणाने गणरायाची प्रतिष्ठापना करुन कोरोनाचे संकट टळू दे साकडे गणरायाला घातले. आज शुक्रवार (ता.१०) रोजी भरणे यांनी पत्नी सारिका भरणे यांच्यासह गणरायाचा पुजा करुन गणरायाची प्रतिष्ठापना केली.दरवर्षी भरणे हे कुटुंबीसह गणेशोत्सव उत्साहाने साजरे करतात. मात्र गेल्या दोन वर्षापासुन भरणे कोरोनामुळे साधेपणाने गणेशउत्सव साजरे करीत आहेत.

पूजानंतर भरणे यांनी सांगितले की, अद्यापही देशावरील कोरोनाचे संकट टळले नाही. गणेशउत्सावामध्ये नागरिकांनी गर्दी टाळावी. शासन,प्रशासनाच्या सुचनांचे पालन करुन साधेपणाने गणेशउत्सव साजरा करावा.घराच्या बाहेर पडताना मास्कचा वापर करावा. तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. कोरोनाच्या काळामध्ये स्वतःच्या आरोग्यासह कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करुन गणराया कोरोनाचे संकट दूर करुन इंदापूर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस पडू दे असे साकडे घातले.

loading image
go to top