पुणे - शालेय शिक्षण विभागाने २०२४-२५ साठी ‘क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारा’साठी राज्य निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार १०९ शिक्षकांची निवड यादी गुरूवारी जाहीर करण्यात आली..यात पुणे जिल्ह्यातील सहा शिक्षकांना प्राथमिक, माध्यमिक, विशेष शिक्षक कला आणि आदिवासी क्षेत्र यात उत्कृष्ट काम केल्याबद्दल पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण येत्या सोमवारी (ता. २२) मुंबईत होणार आहे.राज्यात १९६२-६३ पासून राज्य शिक्षक पुरस्कार योजना सुरू आहे. नि:स्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे ‘क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत..२०२४-२५च्या पुरस्कारासाठी शिक्षकांची अंतिम निवड करण्यासाठी २५ ऑगस्ट रोजी राज्य निवड समितीची बैठक झाली. या समितीने त्याचदिवशी शिक्षकांची प्रवर्गनिहाय निवड यादी राज्य सरकारकडे सादर केली. त्यानुसार राज्य सरकारने राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांची निवड यादी जाहीर केली आहेत..पुरस्कार जाहीर झालेले पुणे जिल्ह्यातील शिक्षक -शिक्षकाचे नाव : पुरस्काराचा गट : शाळा- छाया जगदाळे, सहाय्यक शिक्षक : प्राथमिक शाळा : जिल्हा परिषद शाळा, जगतापवस्ती (ता. पुरंदर)- निलम गायकवाड, सहाय्यक शिक्षक : प्राथमिक शाळा : सर सेनापती जनरल अरूणकुमार वैद्य प्राथमिक विद्यालय महापालिका शाळा क्रमांक ९१ मुलांची खुळेवाडी- मनोज नायकवाडी, सहाय्यक शिक्षक : माध्यमिक शाळा : स्वा. से. कै. शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालय, पिंपळे खालसा, हिवरे कुंभार (ता. शिरूर)- संजीव वाखारे, सहाय्यक शिक्षक : माध्यमिक शाळा : श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, चिंचवडगाव- संगिता हिरे, सहाय्यक शिक्षक : आदिवासी क्षेत्र-प्राथमिक शाळा : जिल्हा परिषद शाळा, मुथाळणे (ता. जुन्नर)- भारती भगत, सहाय्यक शिक्षक : विशेष शिक्षक कला : लोयोला हायस्कूल, पाषाण रस्ता.प्रवर्गनिहाय शिक्षकांच्या पुरस्कारांची संख्या -प्रवर्ग : पुरस्कारांची संख्या- प्राथमिक : ३८- माध्यमिक : ३९- आदिवासी क्षेत्र (प्राथमिक) : १९- थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार : ८- विशेष शिक्षक कला/क्रीडा : २- दिव्यांग शिक्षक/दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक : १- स्काऊट/गाइड : २- एकूण : १०९.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.