
पुणे - मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) च्या संशयित रुग्णांच्या घशातील स्त्रावांच्या नमुन्यांची तपासणी याआधी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) मध्ये होत होती. परंतु, आता ही तपासणी मुंबईच्या कस्तुरबा संसर्गरोग रुग्णालय व नागपूरच्या ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) मध्ये देखील ही तपासणी होणार आहे. तसेच त्याचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेन्िसंग) देखील या प्रयोगशाळांत केले जाणार आहे.