Murlidhar Mohol
sakal
हडपसर - राज्यातील सहकार चळवळ देशाला मार्गदर्शक आहे. त्याचे महत्त्व लक्षात घेता सहकारी बँकांसह त्याच्या विस्ताराला चालना देणे, त्यांचे प्रश्न सोडविणे आणि आधुनिक व्यवस्थेत ही चळवळ सक्षम बनविण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक भूमिका घेत आहे. याशिवाय शहरी सहकारी बँकांना भेडसावणाऱ्या ऑनलाइन बँकिंगसह विविध अडचणी सोडविण्यासाठीही आपण पाठपुरावा करू, असे आश्वासन केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले.