State-level Satyashodhak convention begins in grand style at Otur
sakal
ओतूर - ओतूर, ता. जुन्नर येथे सत्यशोधक भाऊ कोंडाजी डुंबरे पाटील प्रतिष्ठान आयोजित महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्यव्यापी सत्यशोधक अधिवेशनाचे उद्घाटन शनिवारी माजी अन्न व औषध प्रशासन मंत्री व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते व खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार शरद सोनवणे, किरण लहामटे, माजी आमदार डॉ. सुधिर तांबे, दिलीप ढमढेरे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, विघ्नहर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर, मु. स. अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी, उद्योजक मंगेश आमले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.