
मार्केट यार्ड : राज्यभरातील विविध मागण्यांसाठी सुरू झालेल्या मालवाहतूकदारांच्या आंदोलनाला पुणे शहरात बुधवारी समाधानकारक प्रतिसाद मिळाला. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी शेतीमाल वाहतूक करणाऱ्या वाहनांना सूट देण्यात आली होती. मात्र, गुरुवारपासून या गाड्याही आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य वाहन चालक-मालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बाबा शिंदे यांनी दिली.