
Pune Crime
Sakal
पुणे : अवघ्या तीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला येथील विशेष न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. नराधमाच्या क्रूर अनैसर्गिक लैंगिक अत्याचारामुळे मुलीच्या गुप्तांगाला गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यामुळे मुलीच्या गुप्तांगांवर मोठी शस्त्रक्रिया करून तिच्यावर उपचार करण्यात आल्याचा उल्लेख करत विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांनी हा निकाल दिला.