Airmen Ejection System : लष्करातील वैमानिकांच्या सुरक्षेसाठी पावले

‘एआरडीई’कडून अभ्यास; निर्गमन प्रणालीमध्ये अधिक सुरक्षा पर्यायांची गरज
steps taken for safety of Airmen in Army need for more security options in ejection system
steps taken for safety of Airmen in Army need for more security options in ejection systemsakal

पुणे : आपत्कालीन स्थितीत लढाऊ विमानातून बाहेर पडण्यासाठी निर्गमन प्रणाली (इजेक्शन सिस्टिम) वापरली जाते. मात्र, काही वेळा यामध्ये वैमानिकाला इजा होण्याची शक्यता असते. आता याचसाठी पुण्यातील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापनेने (एआरडीई) सुरक्षित पर्याय सुचविला असून, यामुळे भारतीय लष्कराला मोठा फायदा होणार आहे.

वैमानिकाच्या जिवाला धोका निर्माण झाल्यास आर्थिक आणि सामरिक आघाडीची मोठी हानी होते. म्हणूच जगभरात वैमानिकांच्या सुरक्षिततेसाठी संशोधन सुरू असून, विविध प्रणालींचा विकास त्याचबरोबर पर्यायांचा अभ्यास करण्यावर शास्त्रज्ञ भर देत आहेत. याच अनुषंगाने ‘एआरडीई’तील शास्त्रज्ञ डॉ. बी. ए. पराते यांनी हा अभ्यास केला असून, त्याबाबतची माहिती ‘डिफेन्स सायन्स जर्नल’मध्ये नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे.

या घटकांमुळे वाढतो धोका

  • बाहेर पडण्याचा वेग आणि वेळ

  • हवेची घनता

  • बाहेर पडण्यासाठी झालेला स्फोट

परिणाम

  • वैमानिकाचा सूट फाटणे

  • शरीराच्या हालचाली अनियंत्रित होणे

  • चेहरा व डोळ्यातून रक्त येणे

  • डोक्याला इजा होणे

  • फुफ्फुस किंवा आतड्यांना इजा होणे

आपत्कालीन स्थितीमध्‍ये वैमानिकांना विमानातून बाहेर पडताना विविध प्रकारच्या घटकांचा सामना करावा लागतो. अनेकदा अशा स्थितीत वैमानिकाच्या मणक्यालाही इजा होत त्यास अपंगत्‍व येते, तर काहींचा प्राणदेखील यामुळे जातो. यासाठी सुरक्षेच्या अनुषंगाने अत्याधुनिक अभिकल्पना (डिझाइन), विकास आणि स्मार्ट इजेक्शनशी संबंधित कामगिरी लक्षात घेत लढाऊ विमानाच्या अनुप्रयोगासाठी निर्गमन प्रणालीचा विकास करण्याची आवश्‍यकता आहे.

- बी. ए. पराते, सहसंचालक, एआरडीई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com