esakal | पुण्यात दोन दिवस पुरेल एवढाच लशींचा साठा!
sakal

बोलून बातमी शोधा

Stocks of vaccines will last for two days in Pune

रोज २० हजार लोकांना लस दिली जात असतानाच महपालिकेकडे जेमतेम ४२ हजार लशीचे डोस शिल्लक राहिले आहेत.

पुण्यात दोन दिवस पुरेल एवढाच लशींचा साठा!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे  : एकीकडे लस घेण्याचे लोकांना आवाहन, त्यासाठीच्या सुविधांची घोषणा, दोनशेच्यावर लसीकरण केंद्र, त्यावरचे पुरेसे मनुष्यबळ असल्याचे महापालिका दाखवत आहे. पण प्रत्यक्षात लोकांना लशीसाठी चकराच माराव्या लागत आहेत. सध्या ‘डोस’ नाहीत, ते उद्या मिळतील,’ असे सांगून लोकांना घरी पाठवले जात असल्याच्या तक्रारी आहेत.

दरम्यान, रोज २० हजार लोकांना लस दिली जात असतानाच महपालिकेकडे जेमतेम ४२ हजार लशीचे डोस शिल्लक राहिले आहेत. ते पुढच्या दोन दिवसांत संपण्याची शक्यता असून, नव्याने दोन लाख डोस उपलब्ध होतील, असे महापालिका सांगत आहे. मात्र, पुरेसे डोस नसल्याने पुणेकरांची अडचण होण्याची शक्यता आहे.

'कोरोनाला नमवण्यासाठी लसीकरण हा एक उपाय'; PM मोदींनी घेतला दुसरा डोस​

गेल्या काही दिवसांत लसीकरणाच्या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, गेल्या चार-पाच दिवसांपासून लोकांना खासगी रुग्णालये आणि महापालिकेच्या केंद्रांत लस मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. नावनोंदणीची प्रक्रिया करूनही लोकांना लस टोचून घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. मुळात खासगी रुग्णालये आणि अन्य केंद्रांवर लशीचे डोस उपलब्ध नसल्याने केंद्र व्यवस्थापनापुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत.
 

पुण्यात मिनी लॉकडाऊन तरीही कोरोनाचा कहर; रुग्णवाढीचा आकडा चिंताजनक​

loading image