Stolen ATM machine
Stolen ATM machine

चोरट्यांनी ATM मशीन स्कॉर्पिओतून पळवलं; 5 मिनिटाची चोरी CCTV त कैद

मंचर शहरात भरवस्तीत मुळेवाडी रस्त्यावरील ॲक्सिस बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी स्कॉर्पिओ गाडी मध्ये टाकून चोरून नेले आहे. पाच लाख एक हजार रुपये रक्कम एटीएम मशीन मध्ये होती. गुरुवारी मध्यरात्री 1 वाजून 30 मिनिटांच्या आसपास घडलेला चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे ही घटना पाहणाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतली. चोरटे निघून गेल्यानंतर पोलिसांना माहिती कळविली.

आंबेगाव, खेड व जुन्नर तालुक्यातील दहा पोलीस गाड्यातून सर्वत्र पोलिसांनी नाकेबंदी केली. पण चोरटे पोलिसांना गुंगारा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. जुन्नर तालुक्यातील सावरगाव पर्यंत स्कॉर्पिओ गाडी गेल्याचे आढळून आले आहे. दरम्यान बँकांच्या एटीएम मशीनच्या सुरक्षेचा प्रश्न  एरनीवर आला आहे.
 

अॅक्सिस बँक शाखेचे एटीएम मशीन मंचर येथील माजी सरपंच बाळासाहेब बाणखेले  यांच्या व्यापारी गळ्यात गेल्या चार वर्षापासून आहे. पण येथे बँकेने सुरक्षा रक्षक नेमलेला नसून सायरनचीही व्यवस्था नाही. चोरटे सफेद रंगाची स्कार्पिओ गाडी घेऊन एटीएम मशीन जवळ आले. त्यावेळी एक कामगार रस्त्याने जात होता. त्यामुळे चोरट्यांनी पुन्हा यु टर्न घेऊन गाडी मुळेवाडी चौकात आणली. एटीएम जवळ कोणीही नाही. ही खात्री पटल्यानंतर त्यांनी पुन्हा स्कार्पिओ गाडी एटीएम मशीन जवळ उभी केली. तेथे वायर रोप टाकून स्कार्पिओ गाडीच्या सहाय्याने मशीन ओढून बाहेर काढून गाडीमध्ये ठेवली. हा प्रकार पाचच मिनिटात घडला. सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे. जवळच असलेल्या इमारतीतून काही जणांनी चोरीचा प्रकार  पाहिला. पण त्यांनी आरडाओरड करण्याचे सौजन्य दाखवले नाही. चोरटे एटीएम मशीन घेऊन गेल्यानंतर त्यापैकी एकाने मनसेचे नेते वैभव बाणखेले यांना ही माहिती सांगितली. बाणखेले यांनी ताबडतोब जवळच राहणारे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांना सदर घटना कळवल्यानंतर खराडे थेट पळतच घटनास्थळी आले. पोलीस गाडीही  तेथे आली. बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे ही माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंबाते यांनी राजगुरुनगर, मंचर ,घोडेगाव ,जुन्नर ,नारायणगाव ,आळेफाटा ,ओतूर  येथील पोलिस यंत्रणा अलर्ट केली. सर्वत्र नाकेबंदी करण्यात आली.पण चोरटे मिळाले नाहीत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान तपासणी केलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये एकूण तीन चोरटे गाडीत होते. छत्रपती शिवाजी चौक , छत्रपती संभाजी चौक मार्गे  पिंपळगाव चौकात  गाडी गेली. पुन्हा ते माघारी शिवाजी चौकातून घोडेगाव रस्त्याला गेले.जुन्नर फाट्याहून गिरवली मार्गे सावरगावला (ता.जुन्नर) जात असताना समोरून जुन्नर पोलिसांची गाडी चोरट्यांच्या गाडीला क्रॉस झाली. पण पोलिसांची गाडी पुन्हा माघारी फिरेपर्यंत चोरट्यांची गाडी  भरधाव निघून गेली. गुरुवारी दुपारपर्यंत  चोरट्यांचा शोध लागला नव्हता. घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधिकारी विवेक पाटील यांनी भेट दिली आहे.एक लाख रुपये किमतीचे ए.टी.म  मशीन  होते.रोख रकमेसह एकूण सहा लाख एक हजार रुपयांचा ऐवज  चोरी झाल्याचा गुन्हा मंचर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. 
 

सावरगाव परिसरात सर्वत्र  डोंगर असून  जंगलही आहेत.जुन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे ,वनरक्षक भाग्यश्री टोम्पे , मनीषा बनसोडे यांच्यासह वन कर्मचाऱ्याची व ग्रामसुरक्षा दलाची  मदत  पोलीस  चोरट्यांच्या शोधासाठी घेत आहे. 
 कोणत्याही एटीम मशीनला जीपीएस ची सुविधा नाही.अनेक ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमलेले नाहीत.गेल्या आठवड्यात रागुरुनगर येथे आयडीबीआय बँकेचे ए.टी.म मशीन चोरून नेण्याचा प्रयत्न झाला होता.त्यावेळीही सफेद रंगाच्या  स्कॉर्पिओ गाडीचा वापर केला होता.या गाडीचाच येथेही वापर झाल्याचे आढळून आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com