rakhmabai divate
sakal
नारायणगाव - नारायणगाव बस स्थानकातून चार दिवसापूर्वी चोरीला गेलेले एक लाख वीस हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र नारायणगाव पोलिसांनी इंगळुण (ता. जुन्नर) येथील जेष्ठ महिला रखमाबाई अनंता दिवटे (वय-80) यांच्या ताब्यात दिले. मंगळसूत्र पुन्हा मिळाल्याने रखमाबाई दिवटे या गरीब आदिवासी कुटुंबातील महिलेच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले. त्यांनी नारायणगाव पोलिसांचे आभार मानले आहेत.