

Mohini Survase’s inspiring journey from hardship to becoming a revenue assistant.
esakal
-सुदाम बिडकर
पारगाव : लोणी ता. आंबेगाव येथील वडार समाजातील बांधकाम मजुराची मुलगी मोहिनी मारुती सुरवसे हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत महसूल सहाय्यक पदी निवड झाली आहे. राहायला स्वताची इंचभर जागा नाही भाड्याच्या खोलीत राहत असलेल्या व दगड फोडण्याचे काम करणाऱ्या मारुती अर्जुन सुरवसे व सुरेखा सुरवसे या दांपत्याची मुलगी मोहिनीने जिद्दीने मिळवलेल्या यशाचे परिसरात कौतुक होत आहे.