सांगा, आम्ही कसं जगायचं? दगडखाण कामगारांची स्थिती

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 May 2020

रोजचा दिवस यांच्यासाठी आव्हान

  • दगडखाण कामगारांच्या पुणे जिल्ह्यात ११३ वस्त्या 
  • या वस्त्यांमध्ये ४२ हजार ५४५ कामगार 
  • या मजुरांची २१ हजार कुटुंबं
  • या कामगारांची एकूण संख्या एक लाख तीन हजार ८६०

खाणीच्या माध्यमातून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. त्यातील दहा टक्के रक्कम जरी या कामगारांसाठी वापरली तरी त्यांचे कल्याण होईल.
- बस्तू रेगे, अध्यक्ष, दगडखाण कामगार संघटना

पुणे - किराणा संपल्याने पोरांना काय खायला घालायचं? रोजगार नसल्याने गॅसची टाकी भरून आणायला पैसे नाही, प्यायला पाणी नाही अशा एक ना अनेक व्यथा आहेत. त्यामुळे आम्ही जगायचं तरी कसं? असा प्रश्न दगडखाण कामगारांनी उपस्थित केला आहे. सरकारने आता तरी आमच्याकडे लक्ष द्यावं, अशी आर्त हाक त्यांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे जिल्ह्यात ४२ हजार ५४५ दगडखाण कामगार असून लॉकडाऊननंतर त्यांच्या रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्यांना घरदार आहे ते गावी निघून गेले. मात्र निवारा नसल्याने आम्ही वाघोलीत अडकून पडलो आहोत. बाहेर पडलं तर पोलिस मारतात. त्यामुळे सरकारने आम्हाला गॅस, किराणा आणि पाणी पुरवावे, अशी मागणी कांताबाई पवार यांनी केली. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दगडफोडीची कामे करणारे मजूर हे १०० टक्के स्थलांतरित आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे रेशनकार्ड किंवा इतर कोणतेही ओळखपत्र नाही. ओळखपत्र नसल्याने त्यांना स्थानिक यंत्रणेकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. संतुलनच्या माध्यमातून त्यांना मदत करण्यात येत आहे, अशी माहिती दगडखाण कामगार संघटनेचे अध्यक्ष बस्तू रेगे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stone Mine Worker Issue in lockdown