आंबेडकरांच्या अटकेच्या निषेधार्थ बारामतीत फोडली एसटी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 October 2019

या घटनेचे पडसाद राज्यातील इतर भागांप्रमाणे आज बारामती शहरातही उमटले. आरे वसाहतीत कलम 144 लागू असल्यामुळे पोलिसांनी प्रकाश आंबेडकर यांना ताब्यात घेतले होते.

बारामती शहर : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना अटक केल्याच्या निषेधार्थ आज (रविवार) बारामती शहरात कार्यकर्त्यांनी फ्लेक्स लावून निषेध व्यक्त केला. आरे प्रकरणांमध्ये प्रकाश आंबेडकर यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कार्यकर्ते संतप्त झाले.

या घटनेचे पडसाद राज्यातील इतर भागांप्रमाणे आज बारामती शहरातही उमटले. आरे वसाहतीत कलम 144 लागू असल्यामुळे पोलिसांनी प्रकाश आंबेडकर यांना ताब्यात घेतले होते.

दरम्यान दौंड बारामती या एसटी गाडीच्या काचा गुणवडी चौकात आज दुपारी फोडण्यात आल्या. 4 ते 5 संतप्त कार्यकर्त्यांनी एसटीवर दगडफेक करत आपला निषेध नोंदवला व गाडीच्या काचा फोडल्या.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदर एसटी पोलीस स्थानकात नेली आहे. या या घटनेचा पंचनामा पोलिसांनी केला असून शहरात पोलिसांची पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दरम्यान यामध्ये एका प्रवाशाला काचा लागून तो किरकोळ जखमी झाला आहे मात्र शहरातील परिस्थिती शांत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: stone pelting on ST bus in Baramati