
Sadanand More
Sakal
पुणे : ‘‘कला हे संस्कृतीचे अंग आहे. लोकनाट्य, वगनाट्य, लावणी, चित्रपट अशा सांस्कृतिक क्षेत्रात सर्वच कलाकारांचे मोठे योगदान आहे. ही संस्कृती, कलांचे जतन व्हावे आणि तिचा अस्सलपणा रसिकांपर्यंत पोहोचावा. तसेच, लावणीसारख्या लोककलांचे सुरू असलेले विकृतीकरण थांबावे,’’ अशी अपेक्षा संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी शनिवारी (ता. ४) व्यक्त केली.