उपासमार अन्‌ पोलिसांची दादागिरी थांबवा; अजित पवारांकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

गेल्या महिनाभरापासून एकीकडे उपासमार आणि दुसरीकडे पुणे शहरातील पोलिसांकडून केली जाणारी दादागिरी थांबवा अशी मागणी पुणे शहरातील शिवराय विचार पथारी संघटनेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. परवानाधारक पथारी व्यावसायिकांचे व्यवसाय बंद पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही या संघटनेचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर यांनी गुरुवारी (ता.6) पत्रकार परिषदेत केला.

पुणे : गेल्या महिनाभरापासून एकीकडे उपासमार आणि दुसरीकडे पुणे शहरातील पोलिसांकडून केली जाणारी दादागिरी थांबवा अशी मागणी पुणे शहरातील शिवराय विचार पथारी संघटनेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. परवानाधारक पथारी व्यावसायिकांचे व्यवसाय बंद पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही या संघटनेचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर यांनी गुरुवारी (ता.6) पत्रकार परिषदेत केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिका आणि पुणे पोलिसांनी शहरातील 11 रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत आणि वेगवान करण्यासाठी नवीन योजना आखली आहे. या योजनेचे पथारी व्यावसायिकांकडून करत आहोत. मात्र आम्हाला केंद्र सरकारच्या 2014 च्या फेरीवाला कायद्यांतर्गत परवाने मिळाले आहेत. हे परवाने आपल्याच हस्ते आम्हाला देण्यात आले आहेत. त्यानुसार आम्ही पोलिस आणि पालिका प्रशासनास सहकार्य करण्यास तयार आहोत. तरीसुद्धा आमच्यावर पोलिसांकडून सातत्याने अन्याय करण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर, पोलिसांकडून मारहाण, शिवीगाळ आणि रस्त्यावर माल फेकून देण्याचे प्रकार घडू लागले आहेत. हे प्रकार त्वरित थांबवा आणि आम्हाला न्याय द्या, अशी मागणीही पवार यांना देण्यात आलेल्या निवदेनात करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला जितेंद्र पायगुडे, संजय निपाने, नीलेश हबीब, लक्ष्मीनारायण तडका, ज्ञ्रानेश्‍वर पडवळ, रमेश राऊत आणि सुनील माने आदी पथारी व्यावसायिक उपस्थित होते.

भयानक : लँडिग होतानाच विमानाचे तीन तुकडे; प्रवाशांचे काय झाले फोटो नक्की पाहा

दरम्यान, कात्रज परिसरातील पथारी व्यावसायिकांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने तीन आठवड्यांपासून सातत्याने करण्यात येत असलेल्या अतिक्रमण कारवाईमुळे पथारी व्यावसायिकांची उपासमार होऊ लागली आहे. त्यामुळे ही कारवाई त्वरित थांबवा अशी मागणी आरपीआयच्यावतीने (आठवले गट) महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसात न्याय न मिळाल्यास, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या पक्षाच्या पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्षा संगीता आठवले आणि उपाध्यक्ष महेंद्र कांबळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stop hunger and police Hooliganism Demand to Ajit Pawar in Pune