esakal | अरे बापरे ! तब्बल सहा तास मधमाशांचा रास्ता रोको 
sakal

बोलून बातमी शोधा

vadgaon.jpg

नीरा-बारामती राज्यमार्ग बंद; झाड कोसळल्यानंतर रुद्रावतार 

अरे बापरे ! तब्बल सहा तास मधमाशांचा रास्ता रोको 

sakal_logo
By
चिंतामणी क्षीरसागर

वडगाव निंबाळकर (पुणे) : घर नष्ट होणे ही बाब प्रत्येकाला संतप्त करणारी आहे. यावर कोणीही प्रतिकार करणारच. मधमाश्‍यांचा अधिवास असलेले जुने वडाचे झाड पडले अन मधमाश्‍यांचा रुद्रावतार नुकताच नीरा-बारामती मार्गावर अनुभवायला मिळाला. 

पुणेकरांनी काळजी घेण्याचे महापालिकेचे आवाहन; रोजच्या तपासणीत 28 टक्के कोरोनाबाधित

गेल्या 50 वर्षांचे जुने वडाचे झाड कोऱ्हाळे बुद्रुक हद्दीत रस्त्याच्या कडेला जीर्ण होत चालले होते. यावरील फांद्यावर मधमाश्‍यांचा अधिवास मोठ्या प्रमाणात अनेक वर्षांपासून होता. बुधवारी रात्री पडलेल्या अतिवृष्टीमुळे जमीन मुळापर्यंत ओली झाली. गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास वाऱ्याच्या वेगाने झाड रस्त्यावर पडले. सुदैवाने रस्ता मोकळा होता. यामुळे अपघात झाला नाही. झाडाबरोबर मधमाश्‍यांचा अधिवासही नष्ट झाला. यामुळे संतप्त झालेल्या मधमाशा पडलेल्या झाडाभोवती गोंगाट करू लागल्या.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
माश्‍यांचा गोंगाट जणू प्रश्नच विचारीत होता, "इतके वर्षांचा अधिवास नष्ट झालाच कसा?' अधिकारी आणि कामगारांचा मधमाश्‍यांना हटवण्यावर बराच खल चालला होता. अखेर चार तासांनी माशा शांत झाल्या. मशिनच्या साह्याने रस्ता खुला करण्याचे केलेले काम आणि मधमाश्‍यांची चाललेली चार तासांची दहशत मात्र उपस्थितांनी अनुभवली. या मार्गावरून जाणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णालाही दुसऱ्या मार्गाने न्यावे लागले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

असा आहे घटनाक्रम 
- वाहतूक ठप्प झाल्याने पोलिस आले 
- बांधकाम विभागाच्या सूचनेवरून रस्ता मोकळा करण्यासाठी मशिन घेऊन कामगारही आले 
- मधमाश्‍यांच्या दहशतीने कोणच पुढे येईना 
- कामगारांनी मशिनसाठी आणलेल्या डिझेलद्वारे मधमाशा हुसकावण्यासाठी केलेला प्रयत्न यशस्वी 
- जेसीबी मशिनच्या साह्याने झाड बाजूला करण्याचे काम सुरू 
- पण मशिनच्या तोंडावर (बकेटवर) माश्‍यांनी बसून आपला संताप दाखवला