Raju Shetty : केंद्र सरकारचे नाक दाबण्यासाठी साखर उत्पादन बंद करा; राजू शेट्टी यांचे आवाहन

केंद्र सरकारने वारंवार एफआरपीत वाढ केली. परंतु साखरची एमएसपी (साखरेची किमान विक्री किंमत) प्रतिक्विंटल ३१०० रुपयांच्या पुढे नेली नाही.
raju shetty

raju shetty

sakal

Updated on: 

माळेगाव - केंद्र सरकारने वारंवार एफआरपीत वाढ केली. परंतु साखरची एमएसपी (साखरेची किमान विक्री किंमत) प्रतिक्विंटल ३१०० रुपयांच्या पुढे नेली नाही. त्यामुळे एमएसपी ३१०० ऐवजी ५००० हजार रुपयांपर्यंत वाढवावी आणि इथेनाॅल खरेदी दर प्रतिलिटर ७० रुपयांपर्यंत करावा, तरच ऊस उत्पादकांना प्रतिटन ५ हजार रुपयांपर्यंत ऊसाला दर मिळेल. परंतु हे सरकार निर्ढावलेले असून भांडवलदारांच्या बाजूने निर्णय घेत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com