Dr. Baba Adhav : अतिक्रमण निर्मूलन विभागाची मनमानी बंद करा

पुणे शहरात अधिकृत पथारी व्यावसायिकांवर कारवाई केली जाते, तर अनधिकृत व्यावसायिकांकडून पैसे घेऊन त्यांना अभय दिले जात आहे.
Dr Baba Adhav
Dr Baba AdhavSakal

पुणे - शहरात अधिकृत पथारी व्यावसायिकांवर कारवाई केली जाते, तर अनधिकृत व्यावसायिकांकडून पैसे घेऊन त्यांना अभय दिले जात आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागाची ही मनमानी बंद करा अन्यथा टोकाचे आंदोलन करावे लागेल असा इशारा ज्येष्ठ कामगार नेते, पथारी व्यावसायिक पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी सोमवारी दिला.

पथारी व्यावसायिक पंचायतीतर्फे आज (ता. ४) महापालिकेपुढे आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी डॉ. आढाव यांनी मार्गदर्शन केले. अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीचे निमंत्रक नितीन पवार, पथारी व्यावसायिक पंचायत पुणे जिल्हाध्यक्ष मोहन चिंचकर, शहर पथविक्रेता समितीचे सदस्य नीलम अय्यर, शहनाज बागवान, भीमा लाडके, संजय काची, कमल बदडे, बाळासाहेब पोकळे, ओंकार मोरे, सुरेखा काची, संजय कानडे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.

बाबा आढाव म्हणाले, ‘‘महापालिकेत एकच अधिकारी गेल्या १० वर्षापासून अतिक्रमण विभागाचा प्रमुख आहे. व्यावसायिकांना मारहाण, भांडे लाथाडणे अशी गुंडगिरी उपायुक्त पदावर असूनही केली आहे. तरीही ते कारवाईची धमकी देत असतात. ते दहा वर्षे त्या पदावर असण्यामागे कुणाचे हितसंबंध आहेत ? या अधिकाऱ्याची मुजोरी पथारी व्यावसायिक पंचायत कदापि सहन करणार नाही.

नितीन पवार म्हणाले, ‘‘पथविक्रेता कायदा पथविक्रेत्यांच्या उपजीविकेला संरक्षण देण्यासाठीच केलेला आहे. त्याचाच पालिकेला विसर पडला आहे. रस्तोरस्ती अनधिकृत पथारी व्यावसायिक बसवून स्वतःची घरे भरण्याचे काम अधिकारी करत आहेत.

यावेळी आंदोलनात केंद्राच्या व राज्याच्या कायद्याप्रमाणे काटेकोरपणे पथविक्रेता समितीच्या नेतृत्वाखाली पथविक्रेता विषय हाताळण्यात यावा, पाच वर्षांनी पथ विक्रेत्यांचे सर्वेक्षण करावे, सर्वेक्षण झालेल्या अ, ब, क, ड, ई या सर्व गटातील पथारी व्यावसायिकांचे भाडे विनाअट भरून घेण्यात यावे. नोंदीत परवानाधारकावर कारवाई केल्यास त्याचा माल त्वरित त्वरित सोडवून द्यावा, अनधिकृत विक्रेत्यांच्या संख्येला आळा घालून त्या विषयी चौकशी करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com