Dr. Baba Adhav : शब्दांचे खेळ न करता सरकारने संकटग्रस्तांबरोबर उभे राहावे
आधी विरोधी पक्षात असताना ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणारे, सत्तेत आल्यावर, नियमांमध्ये अशा तरतूद नाही, असे बोलायला लागल्यावर भरवसा कुणावर ठेवायचा हा प्रश्न पडतो.
पुणे - ‘मराठवाड्यासारख्या दुष्काळप्रवण प्रदेशात पावसाळ्यातही जेमतेम पडणारा पाऊस काळ बनून आला. केवळ पीकच नाही तर पिकाखालची जमीनही वाहून गेली. ‘न भूतो’, अशा प्रकारचे हे ओल्या दुष्काळाचे संकट सरकारने गांभीर्याने घेतले पाहिजे.