esakal | पती, आई, मुलासह संसर्गावर मात केलेल्या महिलेची कहाणी
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus

पती, आई, मुलासह संसर्गावर मात केलेल्या महिलेची कहाणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘माझे पती राजेश (Rajesh) यांना एकाएकी ताप आला, औषधे (Medicine) घेतली पण ताप (Flu) काही कमी होत नव्हता. दोन दिवसांत माझ्या आईलादेखील (Mother) त्रास होऊ लागला. तेव्हा समजले की आमचे संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित (Corona) आहे. त्यात राजेश आणि आईला रुग्णालयात (Hospital) दाखल करावे लागले. मुलासोबत मी घरीच उपचार (Treatment) घेतले. आई आणि राजेश दोघांनाही उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यामुळे त्यांची औषधे सुरूच होती. मी पूर्णपणे घाबरले होते. कारण वेळेत उपचार मिळाला नाही तर त्यांच्या जिवाला काही बरं वाईट झालं तर... हा विचार सतत डोक्यात होता. सुदैवाने मुलाला आणि मला काही त्रास नव्हता. त्यामुळे मला राजेश आणि आईच्या उपचारांकडे लक्ष देता आले आणि या परिस्थितीवर आम्ही मिळून मात करू शकलो,’ असं सांगत होत्या शुक्रवार पेठेतील अंजली वाघ. (Story woman who overcame infection Coronavirus with her husband and mother)

अंजली यांच्या कुटुंबात पती राजेश, मुलगा नीरज आणि त्यांची ६२ वर्षीय आई शांताबाई बोराटे असे सदस्य आहेत. राजेश हे ४९ वर्षांचे असून त्यांचे वजन तब्बल १०४ किलो आहे. ते टिळक स्मारक मंदिर येथे अभियंता आहेत. कुटुंबात त्यांच्यात प्रथम कोरोनाची लक्षणे आढळली.

औषधे घेऊनही ताप कमी झाला नाही म्हणून अंजली यांनी कुटुंबातील सर्व सदस्यांची चाचणी करून घेतली आणि सगळ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. परंतु अंजली यांच्या आईची प्रकृती जास्त खराब झाल्यामुळे त्वरित ऑक्सिजन बेडची गरज होती. त्यांच्यासाठी बेडची व्यवस्था झाली पण दोन दिवसांत राजेश यांची तब्येत खालावली. त्यांनादेखील रुग्णालयात दाखल करायला सांगण्यात आले.

हेही वाचा: पुणे पोलिसांनी पूर्ण केली डॉक्टर दाम्पत्याची 'ती' इच्छा...

दरम्यान, कोणत्याच रुग्णालयात बेड नसल्यामुळे परिवाराची त्यांच्या मनातील भीती दाटून आली. या कठीण काळात डॉ. नितीन पोटे यांच्या सहकाऱ्यामुळे बेडची व्यवस्था झाली. वेळेत उपचार मिळाल्यामुळे राजेश सात दिवसांत बरे झाले, तर नऊ दिवसांनी त्यांच्या सासूबाई. एकत्रित येऊन या कुटुंबाने कोरोनावर मात केली.

माझ्या पतीने लशीचा पहिला डोस घेतला होता. एक प्रसंग असा होता जेव्हा सर्व रुग्णालयात चौकशी केली पण कोठेही बेड उपलब्ध झाले नाही. मात्र, टिळक स्मारकचे व्यवस्थापक अतुल वायचळ यांनी मला मदत केली. त्यामुळे आम्ही या संकटातून बाहेर पडू शकलो. वेळेवर उपचार मिळाल्याने आज माझे पती आणि आई दोघे सुखरूप आहेत.

- अंजली वाघ