

Ajit Pawar Death News
ESakal
महाराष्ट्राच्या राजकारणात शिस्त, वेळेची काटेकोरता आणि स्पष्ट वक्तृत्व यांची ओळख असलेले ‘वेळ पाळणारे दादा’ अचानक काळाच्या पडद्याआड गेले. यानंतर संपूर्ण राज्य सुन्न झाले. ज्यांनी आयुष्यभर वेळेचा आदर केला, निर्णय घेताना क्षणही वाया घालवला नाही, त्या दादांची एक्झिटही तितकीच अनपेक्षित आणि वेदनादायी ठरली. त्यांच्या जाण्याने केवळ एक नेता नाही, तर एक शिस्तप्रिय प्रशासक, एक स्पष्टवक्ता राजकारणी आणि अनेकांसाठी मार्गदर्शक हरपला आहे. त्यांच्या निधनानंतर वयाचा एक विचित्र योगायोग दिसून आला आहे.