
Medha Kulkarni
esakal
नवरात्रीच्या उत्साहात पुणे शहर गरब्याच्या थिरकणाऱ्या तालात रंगले आहे. शहरातील अनेक मैदाने आणि लॉन्सवर गरब्याचे रंगतदार कार्यक्रम आयोजित केले आहेत. मात्र, पुण्यातील कोथरूड परिसरातील जीत ग्राउंडवर आयोजित एका गरबा कार्यक्रम राज्यसभेच्या भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी बंद पाडला. त्यांनी थेट स्टेजवर जात कार्यक्रम बंद केला, यावेळी त्यांनीध्वनिप्रदूषण आणि स्थानिक रहिवाशांना होणारा त्रास हे कारण सांगितले.