

Innovative Farming Brings Profit to Ghanvatwadi Farmers
Sakal
चास : घनवटवाडी (ता. खेड) येथील शेतकरी दत्तात्रेय वसंत घनवट व रंजना दत्तात्रेय घनवट यांसह बाळासाहेब घनवट, तुषार विठ्ठल तळेकर यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत स्ट्रॅाबेरीची लागवड केली. चांगले उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांना सध्या लालचुटूक स्ट्रॅाबेरी पिकाची गोडी लागली आहे. दत्तात्रेय घनवट यांनी केवळ वीस गुंठ्यांत तीन महिन्यांत दीड लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. पुढील दोन महिन्यांचे उत्पन्न व बाजारभाव पाहता तीन लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळण्याचा विश्वास आहे.