Stray Dog Attack : सहा महिन्याच्या झोपलेल्या मुलावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी

जुन्नर शहरात तहसील कार्यालयाच्या आवारात लहानग्या मुलावर भटक्या कुत्र्याने हल्ला चढविल्याची घटना घडली.
Dog Attack

Dog Attack

Esakal

Updated on

जुन्नर - जुन्नर शहरात तहसील कार्यालयाच्या आवारात लहानग्या मुलावर भटक्या कुत्र्याने हल्ला चढविल्याची घटना घडली. या हल्ल्यात हा लहानगा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांचा मुद्दा ऐरणीवर आला असून नगरपालिका प्रशासनाने सर्वसामान्य नागरिक, लहान व शाळकरी मुले यांच्या सुरक्षेसाठी आता तरी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे. सदरची घटना बुधवार ता 22 रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली. नवीन सुनील खराडे वय सहा महिने हा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com