ऑक्सिजन पार्क येथे भटक्या श्वानांचा उपद्रव

ऑक्सिजन पार्क येथे भटक्या श्वानांचा उपद्रव
Published on

हिंजवडी, ता. १२ : पुनावळे परिसरात लोकप्रिय ठरत असलेल्या ऑक्सिजन पार्कमध्ये सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सध्या भटक्या श्वानांच्या झुंडींचा त्रास सहन करावा लागत आहे. पार्ककडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दररोज बसणाऱ्या श्वानांच्या झुंडीमुळे अनेक मॉर्निंग वॉकर्समध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ऑक्सिजन पार्कमध्ये येण्याच्या रस्त्यावर श्वानांची मोठी झुंड बसलेली असते हो... त्यांचा काहीतरी बंदोबस्त व्हायला पाहिजे, अशी भावना अनेक नागरिकांनी ऑक्सिजन पार्कचे ज्येष्ठ सदस्य नंदन मिठारी यांच्याकडे व्यक्त केली. याबाबत परिसरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते अजय कुलकर्णी यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर नागरिकांना जागरूक करणारे एक सादरीकरणही समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आले. मात्र, परिस्थितीत फारसा बदल झालेला दिसून येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com