मुंबई-बंगळूर महामार्गालगतच्या 'या' भागातले पथदिवे वर्षभरापासून बंद, नागरिक संतप्त

मुंबई-बंगळूर महामार्गालगतच्या 'या' भागातले पथदिवे वर्षभरापासून बंद, नागरिक संतप्त

बालेवाडी (पुणे) : येथील लक्ष्मी माता मंदिर ते मिटकॉन जवळील मुंबई-बंगळूर महामार्गालगतचे पथदिवे गेले वर्षभर बंद आहेत. त्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. हे पथदिवे त्वरित सुरू करण्याची मागणी नागरिक करत आहे.                 

बालेवाडी येथील लक्ष्मी माता मंदिर जवळून एक रस्ता दसरा चौकातून मिटकॉन कॉलेज, तसेच मुंबई-बंगळूर महामार्गाकडे जातो. या रस्त्याचे काम स्मार्ट सिटीकडून करण्यात येत आहे.  त्यावेळीच हे पथदिवे बंद झाले. त्यामुळे गेले वर्षभर या ठिकाणी पथदिवे नसल्यामुळे परिसरात रात्री  खूप अंधार असतो. या अंधाराचा फायदा घेऊनच सहा महिन्यांपूर्वी या ठिकाणी दोन दुकाने फोडण्यात आली. याशिवाय रात्री महिलांना या भागातून ये-जा करणे असुरक्षित झाले आहे. त्यामुळे बऱ्याच महिला घराबाहेर पडणे टाळतात. या भागातील रस्त्याचे काम स्मार्ट सिटीकडून बऱ्यापैकी पूर्ण झाले असून, काही ठिकाणी विजेचे खांब बसविण्यात आले आहेत. खांब बसवून त्या ठिकाणी विद्युत वाहिन्या, दिवेही बसवण्यात आले आहेत. परंतु, ते अजून सुरू का केले नाहीत, असा सवाल या भागातील नागरिक करत आहेत.        

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा          

या भागात गेल्या वर्षभरापासून पथदिवे नाहीत. त्यामुळे रात्री आणि पहाटेच्या वेळी महिलांना अडवून त्यांची छेडछाड करण्याचे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या भागात लवकरात लवकर दिवे बसवून घेण्यात यावेत.
- विहंग बेंद्रे, बालेवाडी                         

या भागात पथदिव्यांचे खांब बसविण्याचे काम बऱ्यापैकी झाले आहे. एक-दोन दिवसांमध्ये येथे पथदिवे सुरू करण्यात येतील. मात्र, निकमारसमोर चौपाटीजवळ उच्चदाबाची विद्युत वाहिनी गेली आहे. त्यामुळे या वाहिन्या जोपर्यंत भूमिगत केल्या जात नाहीत, तोपर्यंत येथे पथदिवे बसवता येणार नाहीत. हे कामही त्वरित करून दिवे सुरू  करण्यात येतील.
- अरुण गोडबोले, मुख्य अभियंता, पुणे स्मार्ट सिटी

महापालिकेकडून पथदिवे लावण्यासंदर्भात स्मार्ट सिटीकडे पाठपुरावा करून हे दिवे दोन-तीन दिवसात सुरू करण्यात येतील.
- अशोक केदारी, कनिष्ठ अभियंता, विद्युत विभाग, औंध क्षेत्रीय कार्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com