esakal | पुणे मार्केटयार्डातील फळविभागामधील बारा बेशिस्त अडत्यांवर दंडात्मक कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे मार्केटयार्डातील फळविभागामधील बारा बेशिस्त अडत्यांवर दंडात्मक कारवाई

पुणे मार्केटयार्डातील फळविभागामधील बारा बेशिस्त अडत्यांवर दंडात्मक कारवाई

sakal_logo
By
प्रविण डोके

मार्केट यार्ड : शहरातील कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर समितीने मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या आहेत. यामध्ये आतील आणि बाहेरील पाकळ्या दिवसाआड सुरू ठेवण्यात आल्या आहेत. सोमवारी आतील बाजूचे गाळे बंद असतानाही काही अडत्यांनी आतील बाजूचे गाळे सुरू ठेवले होते. त्यामुळे समितीने फळ विभाशिस्त अडत्यांवर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून 20 हजार 60 रूपये दंड वसूल करण्यात आला आहे.

मार्केट यार्डातील भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा, केळी, पान, फुले आणि गुळ-भुसार विभागातील गर्दी कमी करण्यासाठी सातत्याने उपाय-योजना केल्या जात आहेत. शेतीमाल घेऊन येणार्‍या गाड्या, माल खरेदीसाठी येणार्‍या गाड्यांच्या कालावधीसह खरेदी-विक्रीचा व्यवहारावर वेळेची मर्यादा घालण्यात आली आहे. बाजारात अधिक गर्दी होणार नाही, यासाठी पोलिसांची मदत घेण्यात आली असल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले.

हेही वाचा: जावयाने सासूसोबतच मांडला संसार; बिनसल्यावर उचललं टोकाचं पाऊल

फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा विभागातील बाह्य आणि आतील गाळे दिवसाआड सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार काल बाह्य पाकळीतील गाळे सुरू होते. मात्र फळ विभागातील आतील बाजूच्या आडत्यांनी व्यापार सुरूच ठेवला होता. त्यामुळे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांच्या मार्गदर्शनानुसार फळ विभाग प्रमुख बाबासाहेब बिबवे यांनी ही दंडात्मक कारवाई केली.

बाजारात मागील काही दिवसांपासून सातत्याने नियम मोडणाऱ्या अडत्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. परंतु काही अडते परत परत नियम मोडताना आढळून आल्यास त्यांच्यावर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांनी नियम पाळून समितीला सहकार्य करावे.

- मधुकांत गरड, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

loading image