esakal | भिडे आणि एकबोटेंवर रीतसर कारवाई करणार : गृहमंत्री
sakal

बोलून बातमी शोधा

Bhide_Deshmukh_Ekbote

मॉडर्न जेलच्या प्रस्तावालाही मान्यता दिली आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली.

भिडे आणि एकबोटेंवर रीतसर कारवाई करणार : गृहमंत्री

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरेगाव-भीमा प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे या दोघांवर रीतसर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येरवडा कारागृहाला भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. गृहमंत्री देशमुख म्हणाले की, येरवडा कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी झाले आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे जेलची क्षमता वाढविण्यासाठी प्रस्ताव दिला आहे. या जेलमध्ये विविध गुन्ह्यात शिक्षा भोगणारे कैदी आहेत, त्यामुळे जेलच्या रचनेचाही विचार करण्यात येत आहे. याबाबत एक मॅाडेल तयार करण्यात आले असून त्याचे सादरीकरण झालं आहे. जगभरात कोरोनाने थैमान घातले असतानाही येरवडा जेलमध्ये याचं संक्रमण झालं नाही. 

Exclusive:दोन्ही ‘दादां’समोर उभं राजकीय कसोटीचं वर्ष

तसेच पोलिस बांधवांना घर घ्यायच्या विषयावर चर्चा झाली असून मुख्यमंत्र्यांनी त्याला मान्यता दिली आहे. मॉडर्न जेलच्या प्रस्तावालाही मान्यता दिली आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली. भिडे आणि एकबोटे यांच्याविषयी बोलताना देशमुख म्हणाले, भिडे आणि एकबोटे यांच्यावर चार्जशीटचा प्रस्ताव मंजूर झाला असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.  

राज्याच्या तिजोरीत पडली कोटींची भर; महसूलमध्ये नोंदवला नवा विक्रम!

दरम्यान, थर्टी फर्स्टला जिकडे सर्वजण आनंद, जल्लोष साजरा करत असतात, त्यावेळी पोलिस सर्वत्र शांतता आणि सुव्यवस्थेची जबाबदारी पार पडत असतात. त्यांच्या आनंद द्विगुणीत करण्यासाठी आणि त्यांना खंबीर मानसिक आधार देण्यासाठी गृहमंत्री देशमुख यांनी गुरुवारी (ता.३१) रात्री पोलिस नियंत्रण कक्षात हजेरी लावली. आणि पोलिसांसोबत नववर्षाचं स्वागत केलं.  

 - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image