जादूटोणाविरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करणार- धनंजय मुंडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhananjay Munde

जादूटोणाविरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करणार- धनंजय मुंडे

पुणे : अंधश्रद्धा आणि त्यामधून घडणाऱ्या कुप्रथांना आळा घालण्यासाठी या कायद्याची राज्यात कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार असून, सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. जादूटोणाविरोधी कायदा प्रचार व प्रसार समितीच्या वतीने पुण्यात सामाजिक न्याय विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेच्या (ऑनलाइन) उद्घाटनप्रसंगी मुंडे बोलत होते.

महाराष्ट्र हे जादूटोणाविरोधात कायदा करणारे देशातील पहिले राज्य आहे. राज्यात आजही नरबळी, अंधश्रद्धांच्या माध्यमातून लैंगिक शोषण, अत्याचाराचे अनेक प्रकार घडत आहेत. या कायद्याची कठोर अंमलबजावणी करून असे प्रकार कायमस्वरूपी थांबवले पाहिजेत. त्यासाठी या कायद्याचा अधिकाधिक प्रसार होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांनी कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

विभागाचे सचिव सुमंत भांगे म्हणाले, समाजाला अंधश्रद्धांच्या विळख्यातून बाहेर काढून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी हा कायदा पोषक आहे. मुंडे यांच्या नेतृत्वाखाली व्यापक प्रसार मोहीम हाती घेण्यात येत आहे.

जादूटोणाविरोधी कायदा प्रसार समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव यांनी उपस्थितांना कायद्याची ओळख करून दिली. समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी मार्गदर्शन केले. अतिरिक्त समाज कल्याण आयुक्त दिनेश डोके, भारत केंद्रे, प्रशांत चव्हाण, रवींद्र कदम, प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांच्यासह अधिकारी या वेळी उपस्थित होते.

Web Title: Strict Implementation Anti Witchcraft Law Strictly Enforced Dhananjay Munde Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top