esakal | बारामतीत कुठल्या सेवा सुरू व बंद? वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

lockdown

बारामतीत कुठल्या सेवा सुरू व बंद? वाचा सविस्तर

sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती.

बारामती : शहर व तालुक्यात आजपासून (baramati)कडक लॉकडाऊनला (lockdown) प्रारंभ झाला. वैद्यकीय कारणांव्यतिरिक्त इतर कारणांसाठी बाहेर पडणा-यांवर आजपासून पोलिसांनी (police) दंडात्मक कारवाईस प्रारंभ केला. आज सकाळपासूनच पोलिसांनी जवळपास सर्वच चौकात अडथळे लावून वाहतूक प्रतिबंधित केली होती. अत्यावश्यक कारणांसाठी बाहेर पडलेल्या व्यक्तींची ओळखपत्रे किंवा कागदपत्रे पाहूनच त्यांना सोडले जात होते. (strict lockdown begins in baramati).

हेही वाचा: हवेलीकरांनो, पुणे आणि पिपरी चिंचवडला जाण्यापूर्वी हे वाचा...  

बारामतीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आजपासून 11 मे पर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा प्रशासनाने केली आहे. वृत्तपत्र वितरण, दूध, औषध, दवाखाने, नगरपालिका, महावितरण यासारख्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वच आस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत. बँकाही व्यवहार करण्यासाठी बंद राहणार असून केवळ अंतर्गत कामकाज किंवा एटीएममध्ये पैसे भरण्याची परवानगी देण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे, महेश ढवाण यांनी आज शहर व तालुक्यात फिरुन परिस्थितीचा आढावा घेतला. आज पोलिसांनीही नागरिकांना विनाकारण त्रास होणार नाही याची काळजी घेतली, दुसरीकडे नागरिकांनीही घराबाहेर न पडल्याने पोलिसांवरचाही ताण हलका झाला होता.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा पुरेशा प्रमाणात

आजही बारामतीतील कोरोना पॉझिटीव्ह येणा-या रुग्णांची संख्या किंचीत घटली आहे. काल तपासलेल्या 1273 नमुन्यांपैकी 201 रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान 543 रुग्णांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. बारामतीतील आजअखेरच्या एकूण रुग्णसंख्येने आज 19 हजारांचा टप्पा ओलांडत 19016 पर्यंत मजल गाठली आहे. 14543 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 92821 जणांचे लसीकरण आजपर्यंत झालेले आहे. लसीकरणाबाबत मात्र अजूनही लोकांना व्यवस्थित माहिती होत नाही, त्यांच्यापर्यंत व्यवस्थित निरोप जात नसल्याने गोंधळाची स्थिती पाहायला मिळाली. या बाबत कोठे कोणासाठी किती लसीकरण होणार याची एकत्रित माहिती मिळणे गरजेचे असल्याचे लोकांनी बोलून दाखविले.