मंचर - 'मंचर शहरातील गणेशोत्सवाला जुनी व चांगली परंपरा आहे. येथे विसर्जन मिरवणुकीत गुलाला ऐवजी फुलांची उधळण केली जाते. उत्सव गणेश मंडळ पदाधिकारी व नागरिकांनी शांततेत, आनंदात साजरा करावा. उत्सवाला कुणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास त्याची गय केली जाणार नाही.' असा इशारा मंचर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी दिला.