esakal | मोक्काच्या कारवाईबाबत कठोर, नंबरगेम मध्ये आम्ही नाही - गुप्ता
sakal

बोलून बातमी शोधा

amitabh gupta

मोक्काच्या कारवाईबाबत कठोर, नंबरगेम मध्ये आम्ही नाही - गुप्ता

sakal_logo
By
जनार्दन दांडगे.

लोणी काळभोर : चार महिन्यांपूर्वी लोणी काळभोर पोलिस ठाणे पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत आले. त्यावेळी येथील सुविधा अत्यल्प असल्याचे जाणवले. त्यानुसार सीएसआरच्या माध्यमातून येथे महिला पोलिसांसाठी स्वतंत्र कक्ष बांधण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची सोय होणार आहे. या पोलिस ठाण्याला पुण्यातील इतर ठाण्यांत उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. लवकरच हे पोलिस ठाणे देखील त्या तुलनेचे करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (amitabh gupta) यांनी सांगितले.

लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील महिला कक्षाचे उद्घाटन पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत पत्रकारांशी होते. पुढे बोलताना ते म्हणाले, की मोक्काच्या गुन्ह्यांचे अर्धशतक साजरे करणा-या पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी, ‘आम्ही नंबरगेममध्ये जात नाही. पन्नास करायचे की जास्त करायचे हा आमचा हा उद्देश कधीही नसतो,’ अशा शब्दांत अमिताभ गुप्ता यांनी मोक्काच्या कारवाईबाबत कठोर असणार असे संकेत दिले. तसेच “जेव्हा तक्रार दाखल होते त्यावेळी तिचे निरीक्षण व तपास करून त्यानुसार गुन्हे दाखल होतात. आणि गरजेनुसार त्यावर मोक्का लावतो व तशी कारवाई करतो. यापुढील काळात या परिसरातही तुम्हाला तसे बदल दिसून येतील, असं ही ते यावेळी बोलताना म्हणाले.

हेही वाचा: काळजी घ्या, फेरीवाल्यांचे काय ते आम्ही बघून घेऊ - राज ठाकरे

पुणे शहर पोलीस आयुक्त गुप्ता यांना नव्याने समाविष्ट झालेल्या शेवाळेवाडी, लोणी स्टेशन परिसरात वाहतूक पोलिस रस्त्यात आडवे होऊन वाहनचालकांवर कारवाई करत असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, “नियम मोडणा-यांवर वाहतूक पोलिस कारवाई करत असतात. तो त्यांच्या कामाचा भाग आहे. पण एखादा वाहतूक पोलिस अशा पद्धतीने रस्त्यात आडवा येऊन वाहनचालकांवर कारवाई करत असेल तर तशी तक्रार दाखल करावी. अशा पोलिसांवर निश्चित कारवाई केली जाईल.”

हेही वाचा: Delhi Rain : धुवांधार पावसाने राजधानी तुंबली, रस्ते जलमय

यावेळी सहआयुक्त रवींद्र शिसवे, अप्पर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, परिमंडळ पाचच्या पोलिस उप आयुक्त नम्रता पाटील, हडपसर विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणराव विधाते, भारत पेट्रोलियम कार्पोरेशनचे मुख्य प्रबंधक राहुल सूर्यवंशी, लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे शाखेचे सुभाष काळे, पोलिस निरीक्षक सुनील जैतापुरकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू महानोर, श्रीशैल चिवडशेट्टी, पोलिस उपनिरीक्षक, जयंत हंचाटे, अमृता काटे, दिगंबर बिडवे, प्रमोद हंबीर उपस्थित होते.

loading image
go to top