esakal | ...म्हणून मार्केटयार्डातील भुसार बाजार बंद
sakal

बोलून बातमी शोधा

market yard1.jpg

राज्यातील सर्व बाजार समितीच्या आवारात येणारा शेतीमाल नियमनमुक्त करावा. सेस आकारणी (कर) आणि बाजार आवारातील अन्य खर्च रद्द करण्यात यावेत. यासह काही प्रमुख मागण्यांसाठी मार्केट यार्डातील भुसार व्यापार्‍यांनी मंगळवारी (ता. 25) कडकडीत बंद पाळला.

...म्हणून मार्केटयार्डातील भुसार बाजार बंद

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मार्केट यार्ड (पुणे) : राज्यातील सर्व बाजार समितीच्या आवारात येणारा शेतीमाल नियमनमुक्त करावा. सेस आकारणी (कर) आणि बाजार आवारातील अन्य खर्च रद्द करण्यात यावेत. यासह काही प्रमुख मागण्यांसाठी मार्केट यार्डातील भुसार व्यापार्‍यांनी मंगळवारी (ता. 25) कडकडीत बंद पाळला. त्यामुळेच भुसार विभागात सकाळपासूनच गाड्या उतरून घेणे तसेच भरण्याचे काम ठप्प झाले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दि फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्स महाराष्ट्रचे अध्यक्ष वालचंद संचेती म्हणाले, केंद्र सरकारने अन्नधान्य नियमनमुक्त केलेल्या कायद्याची अंमलबजावणी त्वरीत करावी. कृषी उत्पन्न बाजार समिती आवारांतर्गत असलेला मार्केट सेस, देखरेख रद्द करावा व कायदे सुटसुटीत करून व्यापारी वर्गास दिलासा मिळावा या मागणीकरिता महाराष्ट्रातील व्यापार्‍यांनी लाक्षणिक बंद पुकारला होता. त्याअनुषंगाने पुण्यातील मार्केटयार्ड गुळ भूसार विभागासह राज्यातील मुंबई, वाशी, नागपूर, संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, नांदेड अशा सर्व बाजारपेठा 100 टक्के बंद ठेवण्यात आल्या होत्या.

पुण्यात फिल्मीस्टाईल थरार; खूनाचा प्रयत्न करणाऱ्याचा पोलिसांनी केला पाठलाग आणि...

कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये सेस रद्द करण्यात यावा. बाजार समितीचे अस्तित्व टिकविण्यासाठी एमआयडीसीच्या धर्तीवर देखभाल दुरूस्ती खर्च आकारण्यात यावा. बाजार समिती भूखंडाच्या मालमत्ता करामध्ये कपात करण्यात यावी. बाजार समितीचा व्यापारी परवाना ऑनलाइनद्वारे पाच वर्षांकरीता नुतनीकरण करून मिळावा अशा व्यापारी वर्गाच्या मागण्या असल्याचे दि पूना मर्चंट चेंबर्सचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी सांगितले.

loading image
go to top