Pune बारामतीत अत्युत्तम दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

सर्वांना बदलत्या काळानुसार शिक्षणाच्या सर्व संधी मिळतील- अजित पवार

Pune : बारामतीत अत्युत्तम दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न

बारामती : विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून आगामी काळात अत्युत्तम दर्जाचे शिक्षण मिळेल या दृष्टीने प्रयत्न केले जातील, सर्वांना बदलत्या काळानुसार शिक्षणाच्या सर्व संधी मिळतील असा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.

विद्या प्रतिष्ठानच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त बारामतीतील गदिमा सभागृहात आयोजित कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार, संस्थेचे उपाध्यक्ष अँड. ए.व्ही. प्रभुणे, सचिव अँड. नीलीमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, विश्वस्त किरण गुजर, डॉ. राजीव शहा, मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंभोज या प्रसंगी उपस्थित होते.

पन्नास वर्षांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी याच दिवशी म्हणजे 16 ऑक्टोबर 1972 रोजी या संस्थेचा पाया रचला होता, असे सांगून अजित पवार यांनी संस्थेच्या सर्वांगिण प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. संस्थेच्या प्रगतीत सिंहाचा वाटा असलेल्या हयात असलेले व नसलेल्या सर्वांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

या पुढील काळातही बदलत्या परिस्थितीनुसार शिक्षण देण्याचा प्रयत्न संस्थेच्या वतीने केला जाईल, उत्तम दर्जा राखत सर्व सुविधा विद्यार्थी व शिक्षकांना देण्याचा प्रयत्न केला जाईल, शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना उत्तम ज्ञान देण्यासाठी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

विद्या प्रतिष्ठानमध्ये काळाची पावले ओळखून सेंटर ऑफ एक्सलेन्सची उभारणी होत आहे, आपली मुले काळाच्या गतीसोबत राहायला हवीत या उद्देशाने त्यांना उत्तमातील उत्तम ज्ञान देण्याचा प्रयत्न संस्था करत आहे, असेही ते म्हणाले.प्रास्ताविकात अँड. नीलीमा गुजर यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. संस्थेच्या विद्यादीप या नियतकालिकाच्या 25 व्या अंकाचे प्रकाशन या प्रसंगी पवार यांच्या हस्ते झाले. गुणवंत विद्यार्

आता कितीही ऑक्सिजन घ्या....

कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्व सर्वांना समजले, त्याकाळात गाडी पाठविण्यासाठी आग्रह होत असे, आता बारामतीत इतकी झाडे आम्ही लावली आहेत, की तुम्ही कितीही ऑक्सिजन घ्या...असे अजित पवार म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

कामातून लोकांना आपलस करायच आहे...

बारामतीकरांनी आमच्यावर जो विश्वास दाखविला त्या मुळे आमची जबाबदारी वाढली आहे, राजकारण हे खूप कमी करायच आणि काम करत राहाचय, कामातून आम्हाला लोकांना आपलस करायच आहे, असे अजित पवार म्हणाले.