खेड-शिवापूर : मकरसंक्रातीच्या उत्सवामध्ये चाललाय जोरदार प्रचार

महेंद्र शिंदे
Thursday, 14 January 2021

उमेदवारांनी संक्रातीच्या वाणाचे तर पुरुष उमेदवारांनी तीळ-गुळाचे निमित्त करून गुरुवारी घरोघर जाऊन मतदारांना  संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या.

खेड-शिवापूर : ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराच्या तोफा 13 तारखेलाच थंडावल्या आहेत. असे असले तरीही अनेक महिला उमेदवारांनी संक्रातीच्या वाणाचे तर पुरुष उमेदवारांनी तीळ-गुळाचे निमित्त करून गुरुवारी घरोघर जाऊन मतदारांना  संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारे संक्रात सणाच्या शुभेच्छांच्या निमित्ताने उमेदवारांनी गुरुवारी प्रचाराची संधी साधली. 

आर्थिक क्षेत्रात करिअर करायचंय? चिंता करण्याचे कारण नाही 

शुक्रवार (ता.15) रोजी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीचा अधिकृत प्रचार बुधवार 13 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजताच संपला आहे. मात्र मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे गुरुवारी आलेल्या मकर संक्रातीचा सण उमेदवारांसाठी फायद्याचा ठरला. मकर संक्रातीला वाणाचे निमित्त करून महिला उमेदवारांनी आपापल्या वार्डात संक्रातीच्या वाणाचे निमित्त करून महिला मतदारांमध्ये प्रचाराची संधी साधली. तर पुरुष उमेदवारांनीही मतदारापर्यंत पोचण्यासाठी संक्रात सणाचा फायदा करून घेतला. संक्रातीनिमित्त त्यांनी आपापल्या वार्डात मतदारांना तीळ-गूळ देऊन संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अशा प्रकारे अधिकृत प्रचाराची मुदत संपलेली असली तरी संक्रात सणाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने ही संधी साधत महिला आणि पुरुष उमेदवार गुरुवारी मतदारांपर्यंत पोचले. आता या खऱ्या शुभेच्छा मतदारांपर्यंत पोचल्या की नाही 15 तारखेला होणाऱ्या मतदानातून आणि 18 जानेवारीला लागणाऱ्या निकालातूनच स्पष्ट होणार आहे. अन अशा प्रकारची संक्रात यावर्षीच नाही तर दरवर्षी येवो, आणि या उमेदवारांनी यंदाचं नाही तर प्रत्येक वर्षी अशा भरभरून शुभेच्छा द्याव्या, अशी अपेक्षा नागरीक ( मतदार) व्यक्त करत होते. 

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: strong election campaign in sankrati celebrations