
वाघोली - आगामी महापालिका निवडणुकासाठी प्रभाग रचनेत वाघोलीचे दोन तुकडे करून दोन वेगवेगळ्या प्रभागात विभागले जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र असे विभाजन करण्यास तीव्र विरोध होत असून वाघोलीचा एकच प्रभाग ठेवण्याची मागणी होत आहे. यासाठी वेळ प्रसंगी लढा देण्याचा निर्धार रविवारच्या बैठकीत करण्यात आला.